शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (08:01 IST)

सोशल मिडीया अन सेल्फी

सोशल मिडीयावर लाईक मिळवण्याच्या नादात कुठेतरी कसरती करुन सेल्फी काढले जातात. सर्वच वयोगटात हे सारं चाललेलं असत. त्या नादात काही आपला जिवही गमवतात. काय गरज आहे एवढी मेहनत करायची. 
 
सेल्फी काढा पण त्यालाही काही नियम लावले पाहीत. जिथे पाहताच येणार नाही अशा अडचणीच्या अन निसर्ग रम्य ठिकाणी सेल्फी काढला जातो.असो कार्टानेही सहलीला जाताना सेल्फीला बंदी केली आहे अन ते योग्यच आहे सेल्फीच बरच फँड आहेच. तसच राजकारणी लोक ही सेल्फी कशाकशा बरोबर घेतील सांगता येत नाही कॉंग्रेसच्या काळातील अतिशय चांगले रस्त होते अन ते फक्त भाजपच्या काळात खराब झालेत अशा रस्त्यांबरोबरही सेल्फी काढला जातो असले सेल्फीश राजकारणी ही असतात. त्यांनाही नाद लागलाय ह्या मानसिक रोगाचा असो राजकारणात नाही जायचय सांगतोय कोण कशाबरोबर सेल्फी घेईल सांगता येत नाही .वर्तमान पत्रात बातमी वाचली अन अशा बर्याच घटना वाचायला मिळतील मोबाईलच्या नादात सहलीला गेल्यावर ग्रृप सेल्फी घेताना खाडीत पडले सर्वच्या सर्व मेले.अशा घटना वाचल्या की सहानभुती नाही पण संतापच जास्त येतो एवढा मोबाईलचा अन सेल्फीचा मानसिक रुग्ण काय सांगाव अशाना ?खर तर ह्या सोशल मिडीयाने मानसाला पक्का मानसिक रुग्न करुऩ टाकलाय.
 
लहान मुलाही मोबाईल दाखवल्या शिवाय कार्ट झोपत नाही कारण अनुवंशीकच ना आई वडीलांनी कधी मोबाईल सोडला नाही मग कार्ट कसलं ऐकतय. असो पण हे पुढे खुपच घातक आहे माणूस पाच मिनीटही मोबाईल सोडत नाही. माणसाला सांगितल मोबाईल सोडून सर्व देतो फक्त महीना भर मोबाईल नको दिसायला हात शक्य का ते मुळीच नाही हो शक्यच नाही.
 
सेल्फी कुठकुठल्या पद्धतीने लहानांपासून मोठ्या पर्यंत काढतात.ठराविक काळापुरता ठिक आहे पण मानसिक आरोग्य बिघडलय हल्ली त्याच काय?लहान मुलांना मानसोपच्चाराची सद्धा यामुळे गरज पडत आहे. अशा बर्याच गोष्टी आहेत त्यामुळे तरुण वर्गाला मानसोपच्चाराची गरज आहे. सेल्फी हा सुद्धा मानसिक आजारात येवून जातो जेव्हा सतत ची सवय माणसाला मानसिक रुग्ण करुन जाते.असो याविषयी काळजी घ्या. मी तर म्हणेन शिक्षण होई पर्यंत मोबाईल देवू नका. अन अजून बर्याच गोष्टीना आपण बंधन घालू शकतो.
Virendra Sonawane