शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑक्टोबर 2018 (08:56 IST)

संतोष मयेकर यांचे हृद्यविकाराने निधन, गाजवल्या अनेक भूमिका

मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांतून दर्जेदार अभिनयासह विनोदाचे उत्तम टायमिंग असेलेले  अभिनेते संतोष मयेकर (५२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले आहे, संतोष यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाने  मराठी रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर त्यांनी विविध भूमिका साकारल्या. त्यांनी प्रामुख्याने नाटकांमध्ये  विनोदी अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली होती होती. त्यांचे  मालवणी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. ‘वस्त्रहरण’ या तुफान लोकप्रिय नाटकात तात्या सरपंचाची  भूमिका जोरदार गाजली होती. संतोष यांनी  आॅल द बेस्ट, प्रेमा तुझा रंग कसा, विच्छा माझी पुरी करा, टाइम प्लीज, भैया हातपाय पसरी, वाऱ्यावरची वरात आदी नाटकांतही उत्तम अभिनय केला होता. मागील वर्षी २०१७ मध्ये राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या ‘दशक्रिया’ या चित्रपटातील त्यांची भूमिका होती. सोबतच  देवाशप्पथ खोटे सांगेन, चष्मे बहाद्दर, गलगले निघाले, सत्य सावित्री, सत्यवान, सातबारा कसा बदलला, आयपीएल-इंडियन प्रेमाचा लफडा, आर्त आदी गाजलेल्या चित्रपटांतही त्यांनी काम केले आहे. दूरचित्रवाणीवरील फू बाई फू या रिअ‍ॅलिटी शोमधून त्यांनी त्यांची विशेष छाप पाडली. नाट्यदर्पण पुरस्कार, नाट्य परिषदेचा पुरस्कार, संस्कृती कलादर्पण आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.