प्रसिद्ध गायक बालाभास्करच्या कुटुंबाचा कार अपघात, मुलीचा मृत्यू
प्रसिद्ध गायक बालाभास्कर आणि त्याच्या कुटुंबाचा कार अपघात झाला. या दुर्घटनेत बाला भास्करच्या २ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तिरुवनंतपुरमच्या जवळील पल्ली पुरम येथे हा अपघात झाला. बाला भास्कर आणि त्याच्या पत्नीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बालाभास्करची पत्नी लक्ष्मी हिची प्रकृती गंभीर आहे. परंतु, अपघातानंतर त्यांची मुलगी तेजस्विनी हिचा मृत्यू झाला. आणि त्यांचे कुटुंबीय थ्रिस्सूर येथील मंदिराला भेट देऊन परत येत होते. कार अचानक पंचर झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला.
बाला भास्कर दाक्षिणात्य संगीतकार, प्रसिध्द गायक आहे. बाला भास्कर मल्याळम चित्रपटातील सर्वांत तरुण संगीतकार आहे. अल्बम, चित्रपट आणि कॉन्सर्टमध्ये संगीत दिल्यानंतर बाला भास्कर मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीत लोकप्रिय बनला. त्याने उस्ताद जाकिर हुसैन, शिवमनी, हरीहरन यांच्यासोबत काम केलं आहे.