शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 (16:48 IST)

गीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची शक्यता

गुजरातमधील गीर जंगल सिंहांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असून इथे गेल्या ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू झाला आहे. या सिंहांचा मृत्यू फुफ्फुस आणि यकृताच्या संसर्गाने झाल्याची शक्यता आहे. सध्या गीरच्या जंगलामध्ये ५२० सिंह आहेत.
 
सिंहाच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती वन आणि पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव कुमार गुप्ता यांनी दिली. काही सिंहाचा मृत्यू एकमेकांवर केलेल्या हल्ल्यात झालेला असा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे, तर उर्वरित तीन सिंहाच्या मृत्यूवर अहवालानंतर कळून येईल असे गुप्ता यांनी नमूद केले. 
 
पशू चिकित्सक अधिकारी एच.वमजा यांनी माहिती देताना सांगितले, की त्या ११ सिंहाचा मृत्यू फुफ्फुसाच्या संसर्गाने झाला आहे, पण त्याचा संसर्ग का झाला याचा अजून उलघडा झालेला नाही. त्यामुळे इतर सिंहाना संसर्गाची लागण होऊ नये प्रतिबंधात्मक औषधे देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.