सत्य आणि अहिंसेचा संदेश देणार्या महात्मा गांधींची हत्या ३० जानेवारी १९४८ रोजी झाली. पण त्या आधीही म्हणजे २० जानेवारीलाही दिल्लीतच प्रार्थना सभेतच त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. पण सुदैवाने तो अयशस्वी ठरला होता. हल्लेखोराने त्यावेळी हातगोळाही फेकला होता. त्याचा स्फोट होऊन त्यात गांधीजी मारले जावेत अशी त्याची योजना होती.