गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (17:27 IST)

सलीम कुरेशी खून प्रकरण सिरीयल किलर इम्रान मेहंदीसह 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा

औरंगाबाद येथील प्रसिद्ध सिनेमागृह रॉक्सी सिनेमाचे मालक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक, सलीम कुरेशी यांचा खून करणाऱ्या सिरीयल किलर इम्रान मेहंदीसह 8 जणांना जिल्हा व सत्र न्यायधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेपेची आज शिक्षा सुनावली आहे. औरगाबाद येथील हे मोठे प्रकरण असल्याने न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकावर पोलिसांची बारीक नजर होती.
 
मृत सलीम कुरेशी हे 5 मार्च 2012 रोजी रात्री रॉक्सी टॉकीजकडून घरी परतत होते. त्याच वेळी मध्यरात्री टाऊन हॉलजवळ त्यांची कार अडवून त्यांचे अपहरण केले. मात्र दोन दिवसांनंतर सलीम कुरेशींची कार सिल्लेखान्यातील मुख्य रस्त्यावर आणून सोडून मारेकरी पळून गेले होते. . बेगमपुरा पोलीस ठाण्यात सलीम कुरेशींच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता. तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त संदीप भाजीभाकरे यांच्या पथकाने तपास केला आणि कारवर उडालेली लाल माती शहराच्या परिसरात कुठे आहे याचा शोध घेतला होता. पडेगावातील कासंबरी दर्गा परिसरातील असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे पुढे तपासाला गती देत सलीम कुरेशींच्या हल्लेखोरांपर्यंत पोहोचले होते. कुरेशींचा मारेकरी इम्रान मेहंदी यास भाजीभाकरेच्या पथकाने कटकटगेट परिसरातील घरातून अटक केली होती..
 
कुरेशी खून खटल्याच्या तपासादरम्यान मेहंदीच्या टोळीला मोक्का लावला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण करत पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर झाली असता, मोक्काचे विशेष न्यायाधीश राजेंद्र मुगदिया यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. न्यायालयाने इम्रान मेहंदीसह आठ जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.