सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (15:52 IST)

राऊत आणि इतर अटक सदस्य सनातनचे नाहीत असा दावा

सनातन संस्थेने नालासोपारा येथील बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह इतर आरोपी हे सनातन संस्थेचे साधक नसल्याचा दावा केलाय. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी मुंबईत दावा केला असून, अटक आरोपींबाबत आपले हात वर केले आहेत. तसेच मराठा आंदोलन आणि ईदमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सनातनचा होतू होता, असा करण्यात येत असलेला आरोपही सनातनने फेटाळला आहे. 
 
स्फोटके नालासोपारा येथे आढळलेली, त्यानंतर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये हात असलेल्या आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर या आरोपींचा सनातनशी संबंध असल्याचा दावा केला होता. तसेच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांकडून केली होती. त्याच पार्श्वभूमीवर सनातन संस्थेने आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. तर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सनातन ने दावा केला की ,  वैभव राऊतसह अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींचा सनातनशी कोणताही संबंध नाही. तर सनातनचे साधक नाहीत. यावेळी सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी असा दावा केला आहे. त्यांनी कोणत्याही आंदोलन अर्थात मराठा आंदोलन आणि ईद वेळी घातपात किंवा बॉम्बस्फोट करणार असा आरोप सनातन ने फेटाळला आहे.