मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (15:48 IST)

खड्डा दाखवा हजार रुपये मिळवा घोषणा फोल – आमदार पांडुरंग बरोरा

मागील वर्षी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “खड्डे दाखवा व हजार रूपये मिळवा” ही घोषणा केली होती. ही घोषणा फोल ठरल्याचा दावा आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज आंदोलनाच्या माध्यमातून जनतेसमोर आणला आहे. शहापूर मतदार संघात दोन किलोमीटर प्रवास करून खड्डा दाखवला तर लोक करोडपती होतील अशी स्थिती आहे, अशी टीका बरोरा यांनी केली आहे.
 
खड्डे भरण्यासाठी शासनाकडून निधी घेतला पण खड्डे भरण्याचे नाव सत्ताधारी अजूनही घेत नाहीत. खड्डयांच्या नावाखाली रस्त्यांची मलमपट्टी करण्याचे काम बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने झाले आहे. गणेशोत्सवाआधी खड्ड्यांचे काम पूर्ण करावे, असा इशारा त्यांना दिला होता. असे न झाल्याने आज आंदोलनामार्फत अधिकाऱ्यांना जाब विचारायला गेलो असता अधिकारी उपलब्ध नसल्याने उप अभियंत्यांची खुर्ची उचलून खड्डयात टाकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनआंदोलन करण्यात आले. पुढील दोन दिवसांत काम सुरु झाले नाही तर कार्यालयाला टाळे लावण्याचा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे असे पांडुरंग बरोरा यांनी सांगितले आहे.