शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

आरतीत कापूर का लावतात?

जाणुन घ्या धार्मिक कारण
शास्त्रानुसार देवी- देवतांनसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.
 
कापूराचे वैज्ञानिक महत्त्व 
वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की, कापराच्या सुगंधाने जीवाणू, विषाणू, लहान किटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर रहातात.