मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

चहाचे शौकिन असला तरी या चुका करणे टाळा

चहा म्हणजे काही लोकांसाठी अमृतासारखं असतं. चहाविना जगणे अशक्य होईल अनेक लोकांना इतकी सवय असते. परंतू अनेक लोकं चहा पिताना या 5 चुका करतात. तर जाणून घ्या या चुका आणि या हिशोबाने चहाचा आनंद घ्या:
 
 
1 रिकाम्या पोटी चहा पिणे
रिकाम्या पोटी चहा पिणे नेहमीच नुकसान करतं. याने अॅसिडिटी वाढते आणि फ्री रेडिकल्स व कर्करोग सारख्या आजारासाठी जवाबदार ठरू शकतात. तसेच लवकर वयस्कर दिसू लागतात. यासाठी सकाळी उठल्यावर चहा घेण्याऐवजी पाणी प्यावे. नंतर 
 
अर्ध्या तासाने चहा प्यावा.
 
2 जेवल्यानंतर चहा
काही लोकांना जेवण झाल्यावर चहा पिण्याची सवय असते. परंतू हे चुकीचे आहे. असे केल्याने आहारात घेतलेले पोषक तत्त्व शरीरात अवशोषित होऊ पात नाही.
 
3 अती उकळणे
चहा उकळणे गरजेचे आहे परंतू अती उकळणे नाही. चहा अती उकळून किंवा कडक चहा पिणे योग्य नाही. यामुळे अॅसिडिटीची समस्या उद्भवते. म्हणून पाणी चांगलं उकळून, आचेवरून उतरवण्यापूर्वी त्यात चहा घाला.
 
4 चहाचे अधिक सेवन
चहाचे अधिक सेवन हानिकारक आहे. काही बाबतीत चहा अगदी अल्कोहल प्रमाणे आहे. याने पेशी सक्रिय राहतात परंतू अधिक सेवन हानिकारक आहे. प्रमाणात सेवन करणे योग्य ठरेल.
 
5 चहात औषधी
चहात काही औषधी जसे तुळस व इतर काही पदार्थांचे प्रयोग चुकीचे ठरेल. कारण चहात आढळणारे कॅफीन याचे औषधी गुण अवशोषणात बाधक ठरतात.