मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

भिजवलेल्या बेदाणेचे पाणी पिण्याचे फायदे ...

द्राक्षांना सुकवून बेदाणे बनवले जाते. दररोज बेदाणे बेदाण्याचे सेवन तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्ती देऊ शकते. पाण्यात बेदाणे भिजवून खाण्याचे अनेक फायदे आहेत. बेदाणेच्या पाण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात बेदाणे घाला व 20 मिनिटे उकळू द्या. हे पाणी रात्रभर तसेच ठेवून सकाळी प्या. तुम्हाला याचे अनेक फायदे होतील.
 
बेदाणे खाल्ल्याने त्वचेवरील सुरकुत्या मिटतात. यासाठी रोज सकाळी याचे पाणी प्या.
 
नियमित सेवनाने तुमचे पचन, मेटॅबॉलिज्म व्यवस्थित होऊन तुम्ही नेहमी फिट राहाल.
 
तुम्हाला ताप असेल तर बेदाणे पाणी प्या. यातील फिनॉलिक पायथोन्यूट्रियंट ज्यात जर्मीसाइडल, ऍन्टी बॉयटिक व ऍन्टी ऑक्‍सीडंट त्तवे असतात ते ताप नाहीसा करून टाकतात.
 
बद्धकोष्ठता, ऍसिडीटी किंवा थकव्याचा त्रास असेल तर हे पाणी फार उपयोगी आहे.
 
बेदाणे पाणी रोज पिल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. यासोबतच शरीरातील ट्रायग्लिसराईड्‌सची पातळी कमी करण्यासही हे मदत करते.