शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Modified: सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (14:53 IST)

सापांशी निगडित काही शकुन आणि अपशकुन (ज्योतिष शास्त्रानुसार)

साप हा एक असा जीवन आहे ज्याला समोर बघून सर्वांना घाम सुटतो. सापाची भिती इतकी जास्त असते ती लोक सापाच्या नावानेच घाबरतात. शास्त्रानुसार सापाला पूजनीय देखील मानण्यात आले आहे. महादेव नागाला आभूषणाप्रमाणे गळ्यात धारण करतात. सापांविषयी बरेच शकुन आणि अपशकुन आमच्या समाजात प्रचलित आहे.
 
ज्योतिषानुसार सापांविषयी काही शकुन आणि अपशकुन सांगण्यात आले आहे, या संकेतांना लक्षात ठेवून भविष्यात होणार्‍या घटनांची माहिती मिळवून घेता येते. जे लोक ज्योतिषात विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी शकुन आणि अपशकुनाची मान्यता फार महत्त्वाची असते. बरेच लोक या गोष्टींना अंधविश्वास देखील मानतात.   
1- जर एखाद्या व्यक्तीला साप झाडावर चढताना दिसेल त्याला समजून घ्यायला पाहिजे की येणार्‍या काळात काही चांगले होणार आहे. सामान्यतः: हे एक शुभ शकुन आहे आणि धन मिळण्याच्या शक्यतेला दर्शवतात.
 
2 – जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीला साप झाडाखाली उतरताना दिसतो तर हे अपशकुन मानले जाते. असे झाल्याने धनहानी होण्याची शक्यता वाढून जाते. म्हणून पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगायला पाहिजे.
 
3 – जर गरीब व्यक्तीला साप झाडावरून उतरताना दिसेल तर हे त्याच्यासाठी शुभ शकुन आहे. धनहीन व्यक्तीसाठी हा शकुन पैसा प्राप्त होण्याचे संकेत आहे.
 
4 - एखाद्या आवश्यक कार्याला जाताना एखादा साप उजव्या हाताकडे रस्त्यातून जाताना दिसला तर हे शुभ शकुन मानले जाते. असे झाल्याने कार्यात यश मिळण्याची शक्यता वाढून जाते.
 
5 – जर डाव्याहाताकडे एखादा साप तुमचा रस्त्यात येतो तर तुम्हाला सावधगिरीने कार्य करायला पाहिजे. असे न केलेतर कार्यात अपयशाचे योग बनतात.
 
6 – जर एखादा व्यक्ती पांढर्‍या रंगाचा साप बघतो तर हा एक शुभ शकुन मानला जातो. असे झाल्याने व्यक्तीला कार्यात नक्कीच यश मिळत.
 
7 – एखाद्या मंदिरात साप दिसणे शुभ मानले जाते. असे झाल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
 
8 – जर शिवलिंगावर साप लेटलेला दिसला तर हे फारच शुभ संकेत असते. असे झाल्याने व्यक्तीला महादेवाची कृपा प्राप्त होते.
 
9 – मेलेला साप दिसणे अशुभ मानले जाते. म्हणून जर मेलेला साप दिसला तर महादेवाला क्षमा मागायला पाहिजे आणि शिवलिंगावर जल, कच्चे दूध अर्पित केले पाहिजे.
 
10 – जर एखाद्या व्यक्तीला नाग-नागीण प्रणय करताना दिसले तर याला अशुभ मानले जाते. अशात व्यक्तीने नाग-नागिनसमोर थांबायला नाही पाहिजे. जर त्यांच्या प्रेमात विघ्न आले तर हे त्या व्यक्तीसाठी धोकादायक असू शकत. म्हणून अशा जागेवरून लगेचच निघून जायला पाहिजे. नाग-नागिनला कुठल्याही प्रकारची  छेडखानी नाही करायला पाहिजे.