मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (12:41 IST)

अंतराळात पहिल्यांदाच टेनिसचा सामना

अमेरिकी अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात टेनिस खेळून अंतराळात पहिल्यांदाच टेनिस खेळण्याचा मान मिळविला. अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या यूएस ओपन स्पर्धेच्या उद्‌घाटनानिमित्त हा खेळ खेळण्यात आला. 
 
अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि यूएस टेनिस असोसिएशनने याचे आयोजन केले होते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये (आयएसएस) झालेल्या या खेळात कमांडर अँड्र्यू फ्युस्टल, युरोपियन स्पेस एजन्सीचे तीन फ्लाइट इंजिनियर आणि नासाच्या दोन अंतराळवीरांनी भाग घेतला. गंमत म्हणजे अंतराळ स्थानकात गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे टेनिस बॉल उसळलाच नाही. तसेच या अंतराळ स्थानकातील यंत्रसामुग्री खराब होऊ नये, यासाठी एक विशेष प्रकारचा सॉफ्टबॉल यासाठी वापरण्यात आला. अशा प्रकारे न उसळणार्‍या चेंडूने खेळणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे, असे फ्युस्टल याने या सामन्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र अखेर फ्युस्टल व त्याच्या जोडीदारानेच हा सामना जिंकला. या टेनिस खेळाचे थेट प्रसारण एका ग्लोबसारख्या शिल्पाच्या माध्यमातून करण्यात आले. न्यूयॉर्कमधील बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटरच्या बाहेर हे शिल्प लावण्यात आले.