नरभक्षक वाघीण अखेर सापडली, वन विभागाच्या कॅमेऱ्यात टिपली
विधार्भात वाघ मोठ्या प्रमाणत आहेत. त्यातही अनेकदा वाघ माणसावर हल्ला करतो मारून टाकतो. असाच प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडला असून, मोह्दा परिसरात नरभक्षक वाघिणीची मोठी दहशत निर्माण झाली आहे. या वाघिणीला पकडने वन विभागाला गरजेचे झाले असून, या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने अनेक पर्यंत केले मात्र ते निष्फळ ठरले आहेत. मोह्दा आणि जवळील परिसरात भागातील आता पर्यंत १२ शेतकरी शेतमजूर व गुराख्याचा या वाघिणीच्या ह्ल्य्यात बळी गेला आहे. तर अनेक जनावरांचा फडशा पाडला वनविभागाने जंगलाच्या काहीभागात तिला ट्रॅप करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले, तसेच काहीभागात कॅमेरा सुद्धा लावण्यात आले आहेत मोह्दा भागातील आन्जी शिवारात लावण्यात आलेल्या कॅमेरा मध्ये या नरभक्षक वाघिणीचे काही छायाचित्र कॅमेराबद्ध झाले आहेत. त्यामुळे आता वाघिणीचे लोकेशन कळाले असून वन विभागाला मोठी मदत होणार आहे. त्यामुळे आता या वाघिणीला पकडण्यासाठी नेमक काय करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.