लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही,एकनाथ शिंदेंचा महिलांना मोठा शब्द
राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती विधानसभा निवडणुकीतील यशस्वी ठरली होती. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक बोजा येत असून लवकरच ही योजना बंद होणार असल्याचे विरोधक पसरवत आहे. तसेच या योजनेंसाठी अनेक खात्यांचा निधी वापरला जात असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसल्याचे जाहीर आश्वासन दिले आहे.
ते म्हणाले, या योजनेच्या भविष्याबद्दल विरोधकांकडून उलटसुलटचर्चा आणि अफवा पसरवल्या जात असून ही योजना कधीही बंद पडणार असे म्हटले जात आहे. पण मी माझ्या बहिणींना शब्द देतो. की ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.
ही योजना गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरु करण्यात आली असून या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा केले जातात.
Edited By - Priya Dixit