शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 सप्टेंबर 2018 (10:47 IST)

शुल्लक करणातून युवकाने केला खून

murder in kalamb
कळंब पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या चापर्डा येथे शुल्लक कारणावरून एका अल्पवयीन मुलाने इसमाचा खून केल्याची आल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. सुधाकर पंडित लव्हाणे (34)असे मृतकाचे नाव आहे.
 
चापर्डा येथे गणपती विसर्जन झाल्यावर अल्पवयीन मुलाने तलावाच्या पात्रातुन कलशाचं नारळ बाहेर काढून खाण्यासाठी बाहेर काढले. परंतु मुतक सुधाकर लवाने याने आरोपीला मागीतले असता त्यांने दिले नाही यात या दोघांमध्ये वाद झाला. अशातच आरोपीने सुधाकर लव्हाणे यांच्यावर काही कळण्याच्या आत सपासप चाकूने तीन वार केले. यात सुधाकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर या घटनेची माहिती पडतात कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.