मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 23 सप्टेंबर 2018 (00:59 IST)

दक्षिण आफ्रिकेतील गुहांमध्ये सापडले 70 हजार वर्षांपूर्वीचे हॅशटॅग

जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेतील ब्लॉम्बोस गुहांमध्ये पुरातत्त्व तज्ज्ञांना 70 हजार वर्षांपूर्वीचे एक चित्र सापडले असून ते हॅशटॅग सारखे दिसते. यावरुन फार पूर्वीपासून जगात हॅशटॅगचा वापर करण्यात येत असल्याचा अनुमान लावला जात आहे. 
 
पेन्सिलने हे चित्र रेखाटलेले असून क्रॉसहॅश पॅटर्न 9 रेषांचा मिळून बनला आहे. पुरातत्त्व तज्ज्ञांच्या मते हा पॅटर्न पेन्सिल म्हणून वापरल्या जाणार्‍या मातीपासून तयार केला गेला होता. दक्षिण आफ्रिकेच्या विटावाटर्रैंड विद्यापीठाच्या एका शोध पथकाने लुका पोलारोलोयांच्या मार्गदर्शनाखाली हा शोध लावला. पुरातत्त्व तज्ज्ञांना हे चिन्ह दक्षिण आफ्रिकेच्या ब्लॉम्बोस गुहांमध्ये खोदकामादरम्यान एकत्र केलेल्या दगडाच्या उपकरणांचे विश्र्लेषण करताना दिसले. 
 
सिलिकेटच्या एका छोट्या दगडाच्या तुकड्यावर जे होते. या रेषा मनुष्याद्वारा काढल्या गेल्या आहेत. हे सिध्द करण्यासाठी तज्ज्ञाच्या या रेषा विविध पध्दतीने काढल्या. अंतिम अहवालात असे समजले, की आफ्रिकेच्या विविध क्षेत्रात विविध पध्दतींचा वापर करुन वेगवेगळ्या ठिकाणी समान चिन्हे बनवली होती. या चिन्हाचा वापर प्रतिकात्मक कार्यासाठी केला जात होता.