शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 सप्टेंबर 2018 (15:16 IST)

फसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र

udayan raje bhosale
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसले म्हणाले की शरद पवारांनी फसवा-फसवी केली तर आम्ही बघून घेऊ, असा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज कर्मवीर जयंती कार्यक्रमासाठी सातारा दौऱ्यावर होते. चर्चा केल्यानंतर गाडीत बसताना खासदार उदयनराजे यांनी हा इशारा दिला आहे.
 
उदयनराजे यांना राष्ट्रवादीकडून साताऱ्यासाठी तिकीट दिले जाईल की नाही? याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे उदयनराजे यांनी सातारा दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांची भेट घेतली. उदयन राजे हे स्पष्ट वक्ते आहेत ते नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतात.
 
भोसले आणि पवार भेटीवेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी वेगळ्या बाजूला होते तर खासदार भोसले वेगळ्या बाजूला बसले होते, असे चित्र विश्रामगृहात पाहायला मिळाले आहे.