बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 सप्टेंबर 2018 (15:20 IST)

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी

पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन पीक पिवळे पडण्यास सुरवात झाली होती यावेळी पावसाची नितांत गरज होती मात्र दुपारपासून मध्यम स्वरूपात बरसत असलेल्‍या पावसामुळे शेतक-यांच्‍या खरीप हंगामातील पिकांवरील संकट सावट दूर झाले. पिकांना नवसंजीवणी मिळाली आहे.
 
4 सप्टेंबर पासून पावसाने खंड दिल्‍याने पिकांनी माना टाकण्‍यास सुरवात केली  होती. अशात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते मात्र दुपारनंतर कुठे रिपरिप तर कुठे मध्यम स्वरूपाच्या स्वरूपात पावसाच्या सरी कोसळल्यने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने जोर धरल्‍याने पिकांवर आलेल्‍या विविध किडींचा नायनाट होण्‍यासही या पावसाची मदत झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक पावसाची सरासरी 911.34 असून आत्‍तापर्यत जिल्‍हयात वार्षिक सरासरीच्‍या  674.79 मिलिमीटर पावसाची नोंद करण्‍यात आली आहे याची टक्केवारी 74.04 टक्‍के आहे.
 
पावसामुळे पुस प्रकल्‍पात 100 टक्‍के, अरूणावती 95 टक्‍के, बेंबळा प्रकल्‍प 62 टक्‍के, लोअर पूस 92 टक्के, सायखेडा 100, गोकी 91, वाघाडी 85 टक्के, बोरगाव 98 टक्के, अडाण 94 टक्के, नवरगाव 100 टक्के पावसाने प्रकल्‍प भरलेली आहे. तसेच मध्‍यम प्रक्‍ल्‍पात 70 टक्‍के तर 92 लघू प्रकल्‍पात 67 टक्‍के जलसाठा निर्माण झालेला आहे. असे एकूण जिल्‍हयातील 102 मोठे, मध्‍यम व लघू प्रकल्‍प 62 टक्‍के भरलेले आहे.