शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 22 सप्टेंबर 2018 (15:33 IST)

कांदा भाव पडला असून, फक्त एक रुपया किलो

Onion prices have fallen
कांदा पिकाची देशातील राजधानी असलेल्या नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालीये.. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला ६५० रुपये प्रति क्विंटचला भाव मिळतोय. कमी आणि मध्यम प्रतिच्या कांद्याला तर २५० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. दरम्यान मनमाडमध्ये कांद्याला फक्त १०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला.त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मुंबई- आग्रा महामार्गावर कांदा फेकत आपला संताप व्यक्त केला. कांद्याला एक क्विंटल उत्पन्न घेण्यासाठी सातशे ते आठशे रुपये इतका खर्च येतो. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झालाय.