सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 15 सप्टेंबर 2018 (09:43 IST)

देशात ‘टू व्हिलर टॅक्सी’ची सेवा सुरू होणार

देशभरात लवकरच केंद्र सरकारकडून ‘टू व्हिलर टॅक्सी’ची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे असे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले. यावेळी ते  म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरणपूरक इंधनाचा पेट्रोलमध्ये वापर वाढवून किमती आठ ते दहा रुपयांनी कमी करणे शक्य आहे. दरवाढीची झळ नागरिकांना कमीत कमी बसावी म्हणून ‘टू व्हिलर टॅक्सी’ची सेवा सुरू करण्याचे धोरण स्वीकारले असून मंत्रिमंडळात त्यावर चर्चा झाली. यासोबतच सांडपाण्यातून मिथेन काढून सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसेस चालवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात गंगेच्या शुद्धीकरणातून करण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले. याशिवाय इलेक्ट्रिकवर चालणारे ई-वाहन आणि पर्यायी इंधनावर चालणाऱ्या टॅक्सीसाठी आता परमीटची गरज भासणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.