उबर कंपनी देणार उड्डाण करून घेऊन जाणारी टॅक्सी सेवा
भारतात लवकरच उड्डाण करून घेऊन जाणारी टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. यासाठी टॅक्सी सेवा देणाऱ्या उबर कंपनीने अत्याधुनिक टॅक्सी सेवा देण्याचा विचार केला आहे. 'उबर एलीवेट' ही सेवा आता देशभरात दिली जाणार आहे. कंपनीने असे सांगितले आहे की, अत्याधुनिक हवाई टॅक्सी सेवा 'उबर एलीवेट' ही सेवा अमेरिकेच्या बाहेर म्हणजे भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि फ्रान्स येथे पुरवली जाणार आहे. तसेच अमेरिकेत ही सेवा डलास आणि लॉस एंजिलिसमध्ये देखील दिली जाणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार टॅक्सी परिक्षण उड्डाण 2020 मध्ये पुरवली जाणार आहे. यातील 3 शहरांमध्ये 2023 पर्यंत व्यावसायिकरित्या या सेवेला सुरूवात होईल असे देखील सांगितले आहे. उबर एविएशन प्रोग्राममध्ये एरिक एलिसनने सांगितलं की, या सेवेत तुम्ही फक्त एक बटण दाबून तुमची उड्डाण सेवा बोलवू शकता. आम्ही पाच असे देश निवडले आहेत जिथे उबर एअर परिवहनचं रूपच बदलून टाकेल असे म्हटले जात आहे.