मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

नॅनोहून लहान इलेक्ट्रॉनिक मायक्रो कार, दमदार फीचर्स, जाणून घ्या काय आहे खास

आपल्याला नॅनो तर आठवत असेल.. टाटाने नॅनो प्रॉडक्शन बंद केले. आता नॅनोहून अधिक लहान इलेक्ट्रॉनिक मायक्रो कार तयार करण्यात आली आहे. स्वीडनच्या इलेक्ट्रॉनिक कार निर्माता कंपनी Uniti ने ही कार तयार केली आहे. Uniti One नावाची ही कार दिसण्यात नॅनोहून लहान असली तरी फीचर्स दमदार आहे. जाणून घ्या काय आहे खास फीचर्स-
 
- ही मायक्रो कार लहान गल्ल्यांतून सोपेरीत्या वळू शकते आणि प्रदूषणाविना प्रवास करण्यात मदत करते.
 
- युनीटी वन कार कंट्रोल करण्यासाठी स्टेअरिंग व्हील नाही, ट्विन जॉयस्टिक हँडलबार लावण्यात आले आहे. समोरच्या बाजूला मोठी विंडशील्ड लावलेली आहे. या व्यतिरिक्त एक टॅबलेट सारखे डिस्प्ले ज्यावर स्पीड आणि बॅटरी पावरची माहिती मिळत असते.
 
- Uniti One नावाची इलेक्ट्रॉनिक मायक्रो कारला इंडोरमध्ये टेस्टिंग केल्यानंतर अखेर दक्षिणी स्वीडनच्या रस्त्यांवर धावण्यात आले. कंपनीप्रमाणे याची किंमत 17,300 डॉलर (11 लाख 87 हजार रुपये) आहे.
 
- कारमध्ये सुरक्षेसाठी याच्या चारीकडे सेंसर्स लागले आहे ज्याला इंटेलीजेंट सेफ्टी टेक्नोलॉजिससह कनेक्ट केले आहे. हे सेंसर्स कोणतीही वस्तू जवळ येण्याच्या आणि कुठेही आदळण्यापूर्वी कारला दुसर्‍या बाजूला वळवतील. याने अपघात टळेल.
 
- याला फुल चार्ज करून 150 ते 300 किलोमीटर पर्यंत प्रवास केला जाऊ शकतो.
 
- कंपनीप्रमाणे ही मायक्रो इलेक्ट्रॉनिक कार 3.5 सेकंदात 0 ते 80km/h स्पीड पकडते आणि याची टॉप स्पीड 130km/h सांगितली आहे.
- मायक्रो कारमध्ये 22 kWh क्षमतेचे बॅटरी पॅक लावण्यात आले आहे. तसेच मेन बॅटरी बॅकअपसाठी वेगळ्याने ऑग्झिलरी बॅटरी युनिट लावले आहे ज्याने घरी किंवा ऑफिसमध्ये चार्ज करून मेन बॅटरी संपल्यावर देखील 30 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकता.
 
- मायक्रो कारमध्ये ड्रायवरसह एक प्रवाशी प्रवास करू शकतो. या टू सीटर कारची लांबी 2.91 मीटर, रुंदी 1.2 मीटर आणि उंची 1.4 मीटर आहे. याचं वजन 450 किलोग्रॅम आहे अर्थात नॅनो कारच्या तुलनेत खूप कमी आहे.