सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

आता पेट्रोल 55 रुपये तर डिझेल 50 रुपयात मिळेल

सामान्य माणसाला आता लवकरच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून सुटकारा मिळणार आहे. केंद्रीय पीडब्ल्यूडी मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे की पेट्रोलियम मंत्रालय इथेनॉल फॅक्टरी लावत आहे. याने डिझेल 50 रुपयात तर पेट्रोल मात्र 55 रुपया‍त मिळू शकेल.
 
छत्तिसगढाच्या दुर्ग येथे एका कार्यक्रमात भाग घेतला असताना नितिन गडकरी यांनी तेलाच्या समस्येच्या स्थायी समाधान म्हणून सांगितले की आमचे पेट्रोलियम मंत्रालय इथेनॉल तयार करण्यासाठी पाच प्लांट लावत आहे. लाकडाच्या वस्तू आणि कचर्‍याने इथेनॉल तयार केले जाईल. याने डिझेल मात्र 50 रुपयात तर पेट्रोल 55 रुपयात मिळू शकेल.
 
पेट्रोल- डिझेलच्या सतत वाढत असलेल्या किंमतींमुळे भाजप नेतृत्व असलेली केंद्र सरकार सध्या खूप आलोचना सहन करत आहे. गडकरी यांनी म्हटले की मी मागील 15 वर्षांपासून म्हणत आहे की शेतकरी आणि आदिवासी बायोफ्यूल तयार करू शकतात, ज्याने एअरक्राफ्ट उड्डाण घेऊ शकतं. आमच्या नवीन तांत्रिकीच्या बळावर शेतकर्‍यांद्वारे निर्मित इथेनॉलने वाहन चालवता येऊ शकतात.