दोन महिन्यांत पेट्रोलच्या दरात ५ रुपयांची वाढ
दोन महिन्यांत पेट्रोलचे दर जवळपास ५ रुपयांनी वाढले. त्यातही गेल्या दहा दिवसांत पैसा-पैसा वाढत १ रुपये ८० पैशांनी पेट्रोल वाढले. महाराष्ट्रात परभणीतील दराने उच्चांक गाठला. ही इंधन दरवाढ सातत्याने झाल्याने मोठ्या शहरांत भाजीपाल्यांचे भाव २० ते २५ टक्क्यांनी वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरला मागणी प्रचंड वाढल्याने रुपयाची पडझड अजून काही दिवस सुरूच राहणार अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
दुसरीकडे सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच रुपया आणि शेअर बाजार दोन्हीमध्ये पडझड पाहायला मिळाली आहे. डॉलरच्या तुलनेत आज रुपया 72.66 वर येऊन पोहोचला आहे. तर मुंबई शेअर बाजारही आपटला असून 414.40 अंकांची घसरण झाली. निफ्टीही 132.75 अंकानी खाली आला आहे.