आता 'या' तीन बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय
बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा झाली आहे. केंद्र सरकारनं या तीन बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतरचं बँकिंग क्षेत्रातलं हे दुसरं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या तिन्ही बँकांच्या विलीनीकरणानंतर तयार होणारी बँक देशातली तिसरी सगळ्यात मोठी बँक असेल, अशी प्रतिक्रिया वित्त सेवा सचिव राजीव कुमार यांनी दिली आहे.
या तिन्ही बँकांच्या विलीनीकरणामुळे कर्मचाऱ्यांनी चिंतित व्हायचं कारण नाही. कर्मचाऱ्यांच्या हिताचं रक्षण केलं जाईल. विलीनीकरणानंतर ही भारतातली तिसरी सगळ्यात मोठी बँक बनेल, असं ट्विट अरुण जेटलींनी केलं.