शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (15:50 IST)

आता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा निर्णय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. पेन किलर, फ्लू शी संबंधित औषधांवर बंदी येणार आहे. याबाबद कारण देताना औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधे असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. औषधांवर बंदी घालण्यात यावी यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका उप समितीने शिफारस करण्यात आली आहे. शिफारसीनुसार औषधांवर बंदी घातली जाणार आहे. या औषधांवर बंदी घातली गेल्यास पिरामल, मॅक्लिऑड्स, सिप्ला, ल्युपिनसारख्या राष्ट्रीय कंपन्यांना फटका बसणार आहे. सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास फेंसेडिल, सॅरिडॉन, डी कोल्ड टोटलसारखे कफ सिरप आणि पेन किलरवर बंदी येईल. ही सर्व औषधे सर्रासपणे मेडिकल दुकानात विक्री होत होती. यामध्ये ज्या औषधांवर बंदी घालण्यात येणार त्यांची शिफारस ड्रग टेक्नॉलॉजी अॅडव्हायजरी बोर्ड (डीटीएबीने) दिकेली आहे. त्यानुसार सर्व  यादी तयार करण्यात आल्याचे समजते आहे. 343 औषधांचा डीटीएबीने यादीत समावेश केल्याचे म्हटले जात आहे.  त्यामुळे या गोळ्यांचे नियमित सेवन करणारे अडचणीत येतील मात्र होणारे नुकसान टळणार आहे.