मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (12:25 IST)

दगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार

Explosion in stone mines
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री स्फोट झाला. या स्फोटात 11 कामगारांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये 11 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलीस, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. जखमींना येथील जवळच्याच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून त्यांनी स्फोटातील जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी अधिका-यांना आदेश दिले आहेत. दरम्यान, या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही.