मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 ऑगस्ट 2018 (15:08 IST)

भाजपाचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम महापालिकेत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

भाजपाचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम  नगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्यासह विशेष पोलीस दलाची तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. तर या भागात मोठा तणाव निर्माण झाला आहे. छिंदम उपस्थित राहणार असल्याने आज शिवप्रेमी संघटनेच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सरकारचा जाहीर निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. गोरख दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून तोफखाना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. श्रीपाद छिंदम  याने फोन वर बोलतांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द उच्चारले होते याच्या या वाक्त्वायाची क्लिप व्हायरल झाली होती यावर राज्यातील नागरिक संतापले होते. छिंदम विरोधात पोलिसात फिर्याद दिली होती. मात्र जनतेचा राग अजूनही कायम असून छिंदमच्या जीवाला मोठा धोका आहे. त्यामुळे पोलिसांनी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मोठी खबदारी घेतली आहे.