1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 2 ऑगस्ट 2018 (12:29 IST)

हिंदूंच्या सणांनाच आडकाठी का? : राज

Hindutva festivals
मशिदीवरचे रोजचे भोंगे बंद करत नाहीत, मग वर्षातून एकदा येणार्‍या गणेशोत्सवाच्याच बाबतीत ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा का आठवतो. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त साग्रसंगीत गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
 
महापालिकेने हायकोर्टाच्या आदेशानंतर गणेश मंडळांना मंडपासाठी अटी टाकल्या आहेत. दक्षिण मुंबई, गिरगाव या भागातील गणेश मंडळांना मंडपासाठी परवानगी दिली जात नसल्याची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी मंगळवारी ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ठाकरे यांनी गिरगावला भेट दिली.
 
गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणेच उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा. गेली 60 ते 70 वर्षे गिरगावात गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र आताच याबाबत तक्रार आली, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. गणेशोत्सव वर्षातून एकदा दहा दिवस असतो.