1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: यवतमाळ , बुधवार, 1 ऑगस्ट 2018 (08:46 IST)

बापानेच केला ८ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

8 yers old
पीडीतेच्या आईची शहर पोलिसात तक्रार, पुनर्वसन परिसरातील घटना
जन्मदात्या बापानेच आपल्या ८ वर्षाच्या चीमुकलीवर अत्याचार केला. रविवारी घडलेल्या या  माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेसंदर्भात पीडीतेच्या आईने शहर पोलिस ठाणे गाठुन सोमवार दि. ३० जुलै रोजी तक्रार दाखल केली. ही घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार शहरातील धामनगाव मार्गावर असलेल्या एका पुनर्वसन वसाहतीत एक परिवार राहतो. या परिवारात असलेली ८ वर्षीय चीमुकली रविवारी रात्री झोपुन होती. यावेळी तीच्या नराधम बापाने तीच्यावर पाशवी अत्याचार केला. यावेळी त्या चीमुकलीचा आवाज ऐकुन तीची आई जागी झाली. तीने हा प्रकार पाहताच तीच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र त्यानंतर तीने  स्वत:ला सावरुन रात्री शहर पोलिस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल केला असून . या प्रकरणातील आरोपी बापाला शहर पोलिसांनी अटक केली आहे.