सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 18 जुलै 2018 (16:08 IST)

भयंकर: मुलाने ओ दिली नाही, वडीलाने केली हत्या

उत्तर प्रदेशाच्या बस्ती जिल्ह्यात मुलाने वडिलांनी मारलेल्या हाकेला ओ दिले नाही म्हणून वडिलांनी मुलाची हत्या केली आहे. राकेश असं त्या पित्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
 
याप्रकरणात राकेशच्या नीतु या पहिल्या पत्नीचे निधन झाले असून तिच्यापासून त्याला राहुल व राजन ही मुलं होती. त्यानंतर राकेशने अर्चना या महिलेबरोबर दुसरे लग्न केलं. राकेशने कामानिमित्त राहुलला हाक मारली. मोबाईल गेम खेळत असलेल्या राहुलने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे चिडलेल्या राकेशने त्याला मारहाण केली. यावेळी त्याने राहुलच्या छातीवरच लाथ मारली. पण ती वर्मी बसल्याने राहुलला रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. ही गोष्ट लक्षात येताच राकेशने त्याचा मृतदेह जंगलात जाऊन पुरला. संध्याकाळी राजन घरी आल्यावर त्याला राहुल कुठेही दिसला नाही. यामुळे त्याने वडिलांना याबद्दल विचारले. पण राकेशने त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. राजनने आजोबांना फोन करुन याबद्दल सांगितले. राकेशचा स्वभाव माहित असल्याने आजोबांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना राहुल बेपत्ता असल्याचे सांगितले.
 
दरम्यान, गावातील काहीजणांना जंगलात एका मुलाचा अर्धवट पुरलेला मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी याबदद्ल पोलिसांना कळवले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. तेव्हा तो राहुल असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.