मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

यावरून ओळखा की तुमचा बॉयफ्रेंड कंजूष आहे

पैसे जोडणे, वायफळ खर्च न करणे किती जरी योग्य असले तरी जेव्हा गोष्ट रिलेशनशिपचे असते तर भावना अधिक महत्त्वाच्या असतात. परंतू यात हिशोब ठेवला तर नातं विस्कटायला वेळ लागत नाही. अशात आपण ज्यासोबत रिलेशनमध्ये आहात तो काही न काही कारणं देऊन नेहमी पैसा वाचवण्याच्या प्रयत्न करत असेल तर हे नातं पुढे जाऊन अधिक त्रासदायक ठरू शकतं म्हणून काही सवयींवरून ओळखून घ्या तो कंजूष आहे की दिलदार... 


हिशोब ठेवणे
हिशोब ठेवणे चुकीचे नाही परंतू सतत त्यावर चर्चा की केवढे पैसे लागले, केवढे खर्च होतील हे आपल्याला रिलेशन वर परिणाम टाकू शकतात. कारण कंजूष बॉयफ्रेंड आणि त्याच्या सवयींमुळे आपल्याला लाजिरवाणं वाटू शकतं.
 
बजेट डेट
प्रियकर एखाद्या लग्झरी रेस्टॉरन्टएवजी स्ट्रीट फूड कॉर्नर किंवा सामान्य चाट कॉर्नरवर स्वाद घेण्यास बाध्य करत असेल किंवा यात जी मज्जा ती फाईव्ह स्टारमध्ये कुठे असे म्हणत असेल तर समजून जा की तो कंजूष आहे. यात मजा नाही असे नाही तरी विशेष अवसर असल्यासही चांगल्या ठिकाणी ट्रीट देत नसेल तर पैसे वाचवण्याचे बहाणे आहेत समजून घ्या.
 
पब्लिक ट्रांसपोर्ट किंवा तुमचं व्हीकल
पब्लिक ट्रांसपोर्टने प्रवास करणे चुकीचे नाही पण डेटवर जाताना उन्हात आपल्याला मेट्रो किंवा लोकलने प्रवास करवणे जरा अवघड जाणवतं. किंवा कोणत्याही बहाण्याने तुझी गाडी घेऊन घे असं म्हणत असेल तर समजून जा.
 
नो गिफ्ट्स
गिफ्ट्स न देण्याचे त्याकडे अनेक बहाणे असू शकतात. इमोशंसपेक्षा गिफ्ट मोठे नाही असे म्हणून तो गुंडाळू शकतो. परंतू आपल्याकडून गिफ्टची अपेक्षा करत असेल किंवा सहज स्वीकार करत असेल तर समजून घ्या.
 
बिल देण्यावेळी गायब
डेटवर गेले असताना बिल देण्याची वेळ आली की फोनवर बोलण्याच्या किंवा वॉशरुम जाण्याच्या बहाण्याने तिथून गायब होत असल्यास समजून घ्या की बिल आता तुमच्या माथे आहे. किंवा कधी वॉलेट घरी राहायला वा चोरीस गेला असे बहाणेही असू शकतात. 
 
शॉपिंग करणे टाळतो
कंजूष लोकांना शॉपिंग करणे मुळीच आवडत नाही. ब्रांडेड शोरूम्सऐवजी रोड साइड शॉपिंग करायला आवडत असल्यास त्याचा हेतू पैसे वाचवण्याचा आहे समजून घ्या. 
 
इमोशनल बहाणे
मी आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे किंवा पूर्ण घराचा खर्च माझ्या खांद्यावर आहे असे सांगून आपल्या जीवावर मौज करत असेल तर सावध व्हा. आणि हे खरे असेल तो तुम्हालाही पैसे खर्च करायला भाग पाडणार नाही.