रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

थरूर यांना जगातील त्यांच्या प्रेयसींना भेटता येणार नाही

दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या हत्या प्रकरणात दिल्लीतील पटियाला न्यायालयाने काँग्रेस नेते शशी थरूर यांना  जामीन मंजूर केला असला तरी त्यांना देश सोडून जाण्यास बंदी घातली आहे. यांच्यावर टीका करताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी त्यांच्या शैलीत टीका केली असून, न्यायालयाच्या निर्णयामुळे थरूर आता देश सोडून जाऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांना जगातील विविध भागात असणाऱ्या त्यांच्या प्रेयसींना भेटता येणार नाही, असे म्हटले आहे. 

आज दिल्लीतील पतियाळा न्यायालयाने शशी थरूर यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे.  देश न सोडण्याचे देखील आदेश  जामीन मंजूर करतानाच थरूर यांना दिले आहेत.  मंगळवारी न्यायालयात  जामीन मिळावा म्हणून थरूर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सकाळी सुनावणी घेण्यात आली आहे.