मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय

हो... ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय असे चिन्हे दिसत आहेत. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (राजद)च्या 22व्या वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. 

तेज प्रताप यादवची पत्नी ऐश्वर्या राय लालू प्रसाद यादव यांची सून  वर्धापन दिनानिमित्त पाटण्यात ठिकठिकाणी होर्डिंग्जही लावण्यात आली आहेत या होर्डिंग्जमध्ये झळकली आहे. फोटोमुळे ऐश्वर्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

ऐश्वर्या ही राजदचे आमदार आणि बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात आहे. दरोगा राय 16 फेब्रुवारी 1970 ते 12 डिसेंबर 1970 या कालावधीत बिहारचे नेतृत्व केले होते. त्यामुळे नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न लालू करत आहेत अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यात राजकीय रीत्या पिछाडीवर असल्याने लालूंचा हा निर्णय योग्य ठरतो का हे वेळच सांगणार आहे.