शनिवार, 13 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नातीचा आजोबांवर रेपचा आरोप, 65 वर्षीय आजोबांना दोषमुक्त करत कोर्टाने म्हटले...

नवी दिल्ली- प्रत्येक व्यक्ती महिला आणि मुलांच्या राइट्सबद्दल बोलत असतो, त्यासाठी लढत असतो परंतु पुरुषांना वाचवण्यासाठी कायदा नाही.
 
ऑक्टोबर 2015 मध्ये एका अल्पवयीनाने आपल्या आजोबा अर्थात आईच्या वडिलांवर रेप केस लावला होता. आता अडीच वर्ष चाललेल्या कोर्ट केसनंतर दिल्ली कोर्टाने 65 वर्षीय वयस्कर आजोबांना दोषमुक्त केले. हा निर्णय सांगत असताना कोर्टाने म्हटले की देशात महिला आणि मुलांच्या खोट्या केसमध्ये फसवले जात असलेल्या पुरुषांना वाचवण्यासाठी कुठलाही कायदा नाही. 
 
विशेष पोक्सो कोर्टाच्या अतिरिक्त सत्र जज निवेदिता अनिल शर्मा यांनी आपल्या निर्णयात म्हटले की मुलीने आपले स्टेटमेंट्स वारंवार बदलले आहेत. आणि तिच्या आईच्या स्टेटमेंटने देखील आजोबा आरोपी सिद्ध झाले नाहीत.
 
जज यांनी म्हटले की आरोप दोषमुक्त झाल्यावर ही समाज त्यांना निर्दोष समजणार नाही ते त्यांना ही गोष्ट खचत राहील, असे ही होऊ शकतं या वयात निर्दोष असून त्यांना तुरुंगात राहावे लागले. 9 वर्षाच्या नातीने त्यांच्यावर डिजीटल बलात्काराचा आरोप लावला होता. चौकशीनंतर पोलिसांनी केस नोंदवून चार्जशीट दाखल केली होती परंतू आरोप चुकीचे सिद्ध झाले.
 
सुनावणीच्या वेळी आजोबांनी म्हटले की त्यांच्या मुलीने खोटे आरोप लावले आहे कारण तिचा प्रॉपर्टीवर डोळा आहे. वयस्करांप्रमाणे त्यांनी वडिलांचे कत्वर्य म्हणून मुलीला आपल्या घरात राहण्याची परवानगी दिली आणि तिने असे आरोप केलेत. कोर्टात आजोबांविरुद्ध आरोप सिद्ध होऊ शकले नाही. तिच्यासोबत कधी असे कृत्य झाले हे देखील सिद्ध होऊ शकले नाही. या प्रकारे कोर्टाला असे कोणतेही कारण सापडले नाही ज्या आधारावर आजोबांना दोषी सिद्ध करता येईल. निर्णयानंतर जज यांनी म्हटले की प्रत्येक महिला आणि मुलांच्या अधिकारांविषयी बोलतात परंतू कोणालाही पुरुषांची काळजी नाही.