बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अमरनाथ यात्रा, पहिली तुकडी जम्मूहून रवाना

अमरनाथ यात्रेसाठी पहिली तुकडी आज जम्मूहून रवाना झाली. दहशतवाद्यांनी दिलेल्या घातपाताच्या इशाऱ्यामुळे यात्रेसाठी प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यावेळी अमरनाथला जाणाऱ्या भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. जम्मू बेसहून निघालेल्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. 
 
जम्मूच्या भगवती नगर आधार शिबिरातून पहिली तुकडी अमरनाथ गुंफेकडे रवाना झाली. यावेळी बसमधली प्रवासी भक्तगण 'बम बम भोले'चा गजर करत होते. हे सर्व भक्तगण काश्मीरच्या गांदेरबाल स्थित बालटाल आणि अनंतनाग स्थित नुनवान, पहलगाम आधार शिबिरात दाखल होतील. तिथून पायी चालत ३८८० मीटरच्या उंचीवर स्थित गुफा मंदिरात पोहचतील.