बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

शहीदाच्या वडिलांचा अल्टीमेटम, 72 तासांत बदला घेतला नाही तर उचलेन शस्त्र

ईदसाठी सुट्टी घेऊन घरी राजौरी येथे परतणारा जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्रीचा जवान औरंगजेबचे अपहरण करून हत्या केली गेली. औरंगजेबचे वडील मोहम्मद हनिफ हे निवृत्त जवान असून त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना अल्टीमेटम दिला आहे की माझ्या मुलाची हत्या करणार्‍या दहशतवाद्यांचा 72 तासांत खात्मा करा, नाहीतर मी सूड घेईन.
 
जांबाज औरंगजेबने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी टायगरचा खात्मा केला होता. जवानाला गमावून गाव, कुटुंब आणि नातेवाइकांना शोक अनावर झाला आहे. लष्करी जवान देशाच्या रक्षणासाठी प्राण अर्पण करतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आले तेव्हा काश्मिरातील परिस्थिती बदलेल असे वाटले होते परंतू जवानांसाठी कोणीच काही करीत नाही असा आक्रोश औरंगजेबच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. आणि आता सरकारने बदला घेतला नाही तर मी शस्त्र उचलेन आणि सूड घेईन असे अल्टीमेटम दिले आहे.