मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: भोपाळ , शनिवार, 16 जून 2018 (11:36 IST)

भक्तांची संख्या घटल्याने भय्यू महाराजांची आत्महत्या?

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. कौटुंबिक कलहापाठोपाठ त्यांचे दुसरे लग्न हे सुद्धा त्यांच्या आत्महत्येचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दुसरे लग्न झाल्यामुळे भय्यू महाराज यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली होती. त्यांच्या भक्तांची संख्याही घटली होती. शिवाय राजकारण्यांचा राबताही कमी झाला होता. त्यामुळे ते तणावात होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
भय्यू महाराज यांच्या मृत्यूनंतर इंदूर पोलिसांनी तीन दिवस केलेल्या चौकशीतून अनेक तथ्य समोर आले आहेत. भय्यू महाराज यांच्या कुटुंबीयांच्या आणि भक्तांच्या चौकशीतून त्यांनी तणावातूनच आत्महत्या केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. मात्र भय्यू महाराज यांची हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी पूर्णपणे फेटाळून लावली आहे.