बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

महबूबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला, जम्मू कश्मीरमध्ये भाजप सत्तेतून बाहेर पडली

जम्मू कश्मीरमध्ये पीडीपी सोबत असलेली भाजप सत्तेत बाहेर पडली आहे. युती करण्यामागचे जे उद्देश होते ते पूर्ण झाले नसल्याने सरकारमधून बाहेर पडत असल्याचं भाजपचे नेते राम माधव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. जम्मू-कश्मीरमध्ये पूर्ण सरकार नसल्याने भाजपच्या मंत्र्यांना काम करण्यात अडचणी येत होत्या असं राम माधव म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला. 
 
व्यापक देशहित लक्षात घेऊन आम्ही कश्मीरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं भाजपने म्हटलं आहे. जम्मू कश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्याने तिथे राज्यपाल राजवट लागू करावी अशी भाजपने मागणी केली आहे. पीडीपीने सातत्याने आमच्या मंत्र्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला असा आरोप राम माधव यांनी केला आहे.
 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हणजेच मंगळवारी भाजप कार्यालयात एक महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये जम्मू-कश्मीरचे सगळे मंत्री, आमदार आणि प्रमुख नेते यांना बोलावण्यात आलं होतं. कश्मीरमधल्या परिस्थितीबाबत या बैठकीत विस्ताराने चर्चा झाली.