रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच, ४ ठार

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे.  पाकिस्तानने काश्मीरमध्ये पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केला. यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे लोक दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत. सीमेलगतच्या भागातील गांवांमधून ४० हजार नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.
 
हीरानगर, सांबा, रामगढ, अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमेजवळील ५ किमी अंतरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. या भागात सैन्याच्या तुकड्या, बुलेटप्रूफ वाहने देखील पाठवण्यात आली आहेत. तसेच गोळीबारामुळे घर आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.