मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मे 2018 (14:34 IST)

भारतात पाकिस्तानपेक्षा पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग

कर्नाटक निवडणुकीनंतर सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढल असे आता चित्र आहे. कर्नाटकमध्ये प्रचार संपला नाही तर लगेच संपतो ना संपतो तोच, इकडे तोटा भरुन काढण्याच्या नावाखाली पेट्रोल- डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. 
 
आज जर पहिले तर पेट्रोल 33 पैशांनी आणि डिझेल 15 पैशांनी अचानक महाग झाले आहे. मात्र एक गोष्टी पाहिली की आजरी इंधनाचे दर पैशात वाढत असले, तरी त्याचा परिणाम रुपयात होतो आहे. म्हणजेच मुंबईत यावेळेला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत.
 
राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 76.87 रुपये तर डिझेल 68 रुपये प्रति लिटर इतके महाग झाले आहे. रोज होत असलेल्या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांकी दर गाठला असून महागाईचा विक्रम केला आहे. जर जगातील बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे आणि रुपयाचं मूल्य कमी झाल्यामुळे इंधन दर भारतात वाढले आहेत असे समोर येते आहे. तरीही इतकी दरवाढ होण्यामागे केंद्र  केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी आणि विविध राज्यांमध्ये लागणारे कर आणि सेस आहे. जर राजधानी दिल्ली सरकारने लावलेले सर्व कर काढून टाकले, तर दिल्लीत पेट्रोलचे दर अर्धे होई. बीबीसीच्या दिलेल्या वृत्तानुसार, सार्क (SAARC) देशांमध्ये भारत वगळता, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, भूटान आणि बांगलादेशमध्ये पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त आहे. भाराज्यांचे कर आणि केंद्राची एक्साईज ड्युटी यामुळे सर्वसामान्यांना झळ सोसावी लागत आहे.
 
शेजारच्या राष्ट्रांमध्ये पेट्रोलची प्रति लिटर किंमत
पाकिस्तान- 51.79
नेपाळ- 67.46
श्रीलंका- 64
भूटान- 57.24
अफगाणिस्तान- 47
बांगलादेश- 71.55
चीन- 81
म्यानमार- 44