मंगळवार, 11 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 मे 2018 (14:57 IST)

पाकिस्तानी साखरेचं गोदाम फोडले

पाकिस्तानी साखरेचं गोदाम फोडले आहे. हे काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा केले आहे. दहिसरमोरी गावात-डायघर परिसरातील गोडाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फोडले असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह जितेंद्र आव्हाड ही साखरेची गोण्या फोडल्या आहेत. केंद्र सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली आहे, त्यामुळे  साखरेचं गोडाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फोडलं आहे. देशात पुरेशी साखर असताना पाकिस्तानकडून ही साखर आयात करण्यात आली आहे, असा आरोप  करण्यात आला  आहे. देशात  साखरेच्या बाबतीत स्थिती चांगली नाहीय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही योग्य तो भाव मिळत नाहीय. तर दुसरीकडे पाकिस्तानातून साखर आयात करण्याची वेळ सरकारवर आली आहे.  मग साखर आयात का केली ती सुद्धा पाकिस्थान येथून असा  प्रश्न विचारला जातो आहे.