शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काश्मीर खोऱ्यात गुप्तचर संघटांनांकडून हाय अॅलर्ट जारी

रमजानच्या महिन्यात केंद्र सरकारने जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कोणतीही कारवाई करू नये असा आदेश लष्कराला दिलेला आहे. मात्र  दहशतवाद्यांनी मजानमध्ये रक्तपात घडविण्याचा कट रचला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे १२ दहशतवादी कश्मीरमध्ये घुसले असून त्यांचा कश्मीरमध्ये फिदाहीन हल्ला करण्याचा प्लॅन असल्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात गुप्तचर संघटांनांनी हाय अॅलर्ट जारी केला असून लष्कराच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
 
२ जूनला ‘जंग-ए-बदार’च्या दिवशी म्हणजेच रमजानच्या १७ व्या दिवशी कश्मीर खोऱ्यात फिदाहीन हल्ला करण्याचा कट जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने रचला आहे. गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला व पोलीस दलाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जागोजागी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. कश्मीर खोऱ्यातील हॉटेल्स व गेस्ट हाऊस तपासण्यात येत आहे.