1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: पुणे , शनिवार, 5 मे 2018 (12:10 IST)

ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे निधन

dilip kolhatkar dead
'मोरुची मावशी' या नाटकाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या मागे एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
 
कोल्हटकर यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. कोल्हटकर यांची पत्नी दीपाली यांची तीन महिन्यापूर्वी हत्या झाली होती. घरातील नोकरानेच त्यांच्या पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले होते. या धक्क्यातून कोल्हटकर सावरले नव्हते.
 
अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून मराठी रंगभूीवर त्यांनी ठसा उटविला होता. त्यांनी 'पार्टी' या हिंदी सिनेमात अभिनय केला होता. तर 'शेजारी शेजारी' आणि 'ताईच्या बांगड्या' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. 'चिमणराव गुंड्याभाऊ' या मराठी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला होता. त्यांची 'कवडी चुंबक', 'राजाचा खेळ', 'मोरुची मावशी', 'बिघडले स्वर्गाचे दार' ही नाटके विशेष गाजली. त्यांच्या निधनामुळे रंगभूमी ज्येष्ठ आणि प्रतिभावंत रंगकर्मीला मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.