गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मे 2018 (17:13 IST)

यंदा साहित्य क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार नाही

साहित्याचा नोबेल पुरस्कार देणारी संस्थाच सेक्स स्कँडलच्या आरोपांमध्ये अडकल्यामुळे यंदाच्या वर्षी साहित्य क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर होणार नाही. स्वीडीशी अॅकेडमीकडून साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जातो. पण फ्रेंच फोटोग्राफर जीन क्लाउड अरनॉल्टवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यामुळे स्वीडीश अॅकेडमी अडचणीत सापडली आहे. स्वीडिश अॅकेडमी यावर्षी पुरस्कार देणार नसून पुढच्यावर्षी २०१९ साली दोन्ही पुरस्कार विजेत्यांची नावाची घोषणा करु असे संस्थेने म्हटले आहे. अरनॉल्टवर १८ महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केले.
 

लोकांचा अॅकेडमीवरचा विश्वास कमी झाल्यामुळे संस्थेने यावर्षी पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला. परंपरेनुसार पुरस्कार देण्यात यावा असे काही सदस्यांचे मत होते पण अन्य सदस्यांचा विरोध असल्यामुळे पुरस्कार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ७५ वर्षांत पहिल्यांदाच पुरस्कार विजेत्याचे नाव जाहीर होणार नाहीय.