मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

रात्रपाळी करणार्‍या महिलांना कर्करोगाचा धोका अधिक

रात्रपाळी करणार्‍या महिलांना स्तनल त्वचा व पोटाच्या कर्करोगाची शक्यता असते, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. जगात अनेक महिलांमध्ये कर्करोगाचे निदान होत असते. त्यांना होणार्‍या कर्करोगाची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यात रात्रपाळी करणार्‍या महिलांमध्ये कर्करोगाची शक्यता जास्त दिसून आली, पण एका अभ्यासावर आधारित असे हे संशोधन केले असून त्यात दीर्घकाळ रात्रपाळी करणार्‍या महिलांना होणार्‍या कर्करोगाचा अभ्यास केला आहे. त्यात 12 प्रकारचे कर्करोग या महिलांना होत असल्याचे दिसून आले आहे.
 
मेटाअॅनॅलिसिस पद्धतीने यात उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया व आशिया या देशातील 39,09,152 महिलांच्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढण्यात आले. यातील 11,42,628 महिलांना कर्करोग झालेला होता. विशेष करुन परिचारिका रात्रपाळी जास्त काळ करीत असतात त्यांच्यात सहा प्रकारचे कर्करोग दिसून आले आहेत.