गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

साखरेमुळे वाढतो कर्करोगाचा ट्यूमर

लंडन- साखर आणि मीठ हे योग्य प्रमाणात असतील तरच ते आरोग्याला लाभदायक ठरतात. हे दोन्ही पदार्थ असे आहेत की ज्याचा संपूर्ण अभावही वाईट आणि अतिरेकही वाईट.
 
कर्करोगाविषयी 9 वर्षे चालत आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की साखरेचे सेवन कर्करोगाच्या पेशी वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे ट्यूमर वाढण्याच्या गतीत वाढ होते. हे संशोधन कर्करोगाच्या उपचार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. 
 
बेल्जियममधील वलाम्स इनिस्टट्यूटवर बॉयोटेक्नॉलॉजी, कथोलिएके युनिव्हर्सिटी लियूवेन आणि विजे युनिव्हर्सिटी ब्रसेल यांनी देखील या संशोधनाला दुजोरा दिलेला आहे. या संशोधनातून साखर आणि कर्करोग यांचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
आहारात साखरेचा अधिक समावेश असल्यास त्याचा कर्करोग रूग्णांवर खूप प्रभाव होऊ शकतो. वीआईबीकेयू लियूवेनच्या जोहान थिवेलिन यांनी सांगितले की आमच्या संशोधनातून असा खुलासा झाला आहे की साखरेच्य अति सेवनामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्याची गती वाढते.