1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified रविवार, 17 सप्टेंबर 2017 (11:25 IST)

लंडन हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली

लंडनच्या भुयारी रेल्वेमार्गामध्ये शुक्रवारी बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता.  या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. या बॉम्बस्फोटात  29 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आलीये. लंडन स्टेशनजवळील भुयारीमार्गातून जाणा-या एका  ट्रेनमध्ये स्फोट घडवण्यात आला. यासाठी आयईडी स्फोटकांचा वापर करण्यात आला . यावर्षातील ब्रिटनमध्ये झालेला हा पाचवा दहशतवादी हल्ला आहे. या स्फोटासाठी अद्ययावत स्फोटक उपकरणांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. डिस्ट्रिक्ट लाइन ट्रेनच्या मागच्या डब्यातील प्लास्टीकच्या बादलीत हा स्फोट झाला. स्फोटानंतर आग भडकली.स्फोटामुळे प्रवाशांत घबराट पसरली. प्रवाशांची ट्रेनमधून बाहेर पडण्याची धडपड चालू होती. यात २९ प्रवाशी जखमी झाले.