बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (17:48 IST)

लंडनमध्ये विजय माल्याला अटक

बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला आर्थिक अफरातफर प्रकरणी अटक करण्यात आली आहे. विजय मल्ल्याला अटक करण्यात येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 13 जून रोजी विजय मल्ल्याला अटक करण्यात आली होती. भारताने विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्याची विनंती केल्यानंतर ही अटकेची कारवाई झाली होती. मात्र अटक झाल्यानंतर लगेचच जामीन मंजूर झाला होता. न्यायालयाने 4 डिसेंबपर्यंत जामीन मंजूर केला होता. 6 जुलै 2018 रोजी पुढील सुनावणी होणार होती. आज पुन्हा एकदा विजय मल्ल्याला अटक करण्यात आली असून, थोड्याच वेळात न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.